आमच्या या संघटनात्मक व शैक्षणिक Blog वर आपले सहर्ष स्वागत आहे.

Tuesday, April 7, 2015

शिक्षक मित्रहो
          शासन म्हणजे एक अभेद किल्ला आहे. त्या भोवती अनेक किचकट नियम व अटींच्या बुरुजांची तट बंदी तर मध्यभागी सामान्य शिक्षकांसाठी क़्वचितच उघडणारा दरवाजा, परंतु ११ वर्षा पूर्वी एक चमत्कार घडला. दरवाजा खाडकन उघळला, हा चमत्कार कसा घडला ? कोनामुळे घडला ? या प्रश्नाचे उत्तर आहे * महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषद
                                         या संघटनेच्या लढाऊ शिलेदारांनी नेत्यांच्या पाठीशी हजार हत्तीच बळ उभ केल. त्याचा हा परिणाम .....आणि मग सुरु झाली शासन व प्रशासन दरबारी समस्यांची उकल , तुमच्या ......... आमच्या ........ आपल्या ...........सर्वांच्या...........
                    शिक्षक बंधू भगिनींनो  * महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषद * ही एकमेव संघटना श्रमिक संघ नोंदणी कृत असून अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षणिक महासंघ दिल्लीशी संलग्न आहे. पूर्वी ही संघटना १९९० पासून *महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक क्रांतिदल ( शिक्रान्द ) म्हणून ओळखली जायची .त्या वेळी शिक्षक आमदार कै. वसंत बापट  यांच्या अध्यक्षतेखाली व राजेंद्र सपकाळे कार्याध्यक्षतेखाली होती. कै. वसंत बापट यांचे निधन झाले व रामनाथ दादा मोते यांच्या अध्यक्षतेखाली २००६  मध्ये शिक्रान्दचे विलीनीकरण * महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषद * मध्ये झाले. राजेंद्र सपकाळे हे राज्याध्यक्ष तर श्री.अविनाश घोडे सरचिटणीस ,श्री.दिलीप ठाकरे कार्याध्यक्ष आहेत.
                           आज ही  संघटना राज्यभर जिल्हा परिषद, म.न.पा, शाळेतील शिक्षकांच्या समस्यांसाठी व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसाठी राज्यभर कार्य करीत आहे. 
                            शिक्षक बंधू भगिनींनो आज आपण अनेक आघडयांवर शासन व प्रशासन स्तरावरील छोट्या मोठ्या लढाई जिंकत आलो आहोत .त्यातूनच  कार्यकर्त्याच मनोधैर्य निश्चितच वाढले. 
                            महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषदेचा प्रत्येक कार्यकर्ता सेनापती सारखा तोलामोलाचा आहे.त्यान आपापल्या जागी पाय घट्ट रोऊन उभ रहाव.संपर्क,समन्वय,संघटन,ह्या त्रिसूत्रीने कार्याला वाहून घ्याव म्हणजे शैक्षणिक दुष्प्रवृत्तीवर आपला विजय मिळवता येईल .यास्तव लागणारा आश्वासक धीर आपणास महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषदे कडून मिळेल यात शंकाच नाही.
      - राजेंद्र सिताराम  सपकाळे ,राज्याध्यक्ष - 98 22 78 74 78

No comments:

Post a Comment